शादी.कॉम
आजही मुलीचा पारंपारिक लग्न हे ताण वाढवणार , अनेकदा नैराश्य आणणारं असतं...तुम्हाला मुलगी आहे ;हा तुमचा गुन्हा आहे असच अप्रत्यक्षपणे सुचवला जाणं हि भारतीय समाजाची शोकान्तिका म्हणायची का ? कायद्यानुसार हुंडा देणा -घेणा बंद आहे ; पण आजही दुर्देवान अनेक ठिकाणी मुलीचा लग्न हि घरच्यांसाठी चिंतेची बाब आहे .. लग्नाचा सगळा खर्च वधुपक्षाने करायचा या एका साध्या सरळ नियमाने सुद्धा वाधुपित्याचा कम्बरडा मोडून जातो , आयुष्यभराची कमाई खर्ची पडते . "पण नको का ते करायला ?"असच होत आलय आत्तापर्यंत , मग आता कशाला बदलायचे ? असा विचार जेव्हा प्रतिष्ठीत घरातले सुशिक्षीत लोक करतात तेव्हा शिक्षणाने , अनुभवाने तुमच्या विचारप्रक्रियेत , दृष्टीकोनात बदल होतो हे विधान खोटा वाटयला लागता . आजही हुंडा घेतल्याशिवाय लगाना करत नाहीत लोक .मुलीत सगळे गुण तर हवे असतातच पण शिवाय कमावती पण असली पाहिजे , हुंडा पण भरपूर पाहिजे असतो , लग्नही करून द्या ;सगळ्या वस्तू द्या घरातल्या ; दागिने हवेच असतात .. हु...