Posts

Showing posts from January, 2018

येशील ?

पावसात लपवलेले आश्रु पुसायला येशील का रे तू ? धुक्यात हरवलेली ती वाट दाखवायास येशील का रे तू ? रणरणत्या उन्हात तुझ्या मायेची सावली पांघरशील का रे तू  ? अंधारात चालताना लख्खा चंद्रप्रकाश होशील  का रे तू ? तुझ्या आठवणीत आयुष्य जगताना ,नव्या आठवणी देशील का रे तू ? माझ्या भाबड्या मनाला दिलासा देशील का असण्याचा तू? तुझी नसून तुझीच म्हणून जगतीये ,त्या वेड्या मनाला भेटशील का रे तू? आयुष्याच्या शेवटी,निरोप द्यायला तरी येशील का रे तू ? तुझ्या परतीची चाहूल नाही , तरी येशील का रे तू ?                                                                     --ऋतुजा 

यंत्रांची कथा

अभियांत्रिकी दिवसावर सकाळ मधला माझा लेख-सप्टेंबर २६ ,२०१४ माझे नाव ऋतुजा  जगताप.तुम्ही लिहिलेला दिव्य मराठी मधला इंजीनियर वर आधारित लेख वाचला आणि लिहावेसे वाटले. मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्यूनिकेशन मधे इंजीनियरिंग पूर्ण केला आहे. माझी लहान दोन्ही भावंडा इंजीनियर्स आहेत.  इथे आवर्जून नमूद कारावस वाटेल की माझी लहान बहिण  मैकेनिकल इंजीनियर आहे.आमच्या पालकांनी अम्हा दोघी बहिणींना परदेशी उच्च शिक्षणासाठी पाठवले।          गेले ४  वर्ष मी टेलीकॉम  क्षेत्रात कार्यरत आहे. टेलीकम्यूनिकेशन, नेटवर्किंग मधे काम करताना घेतलेल्या शिक्षणाचा नक्कीच उपयोग झाला आणि तो झालाच पाहिजे अशी एक इच्छा होती नोकरी शोधत असताना . भारतात किंवा परदेशात इंजीनियर्स ना खूप मागणी आहे. इथे माझ्या बहुतांश मैत्रिणी इंजीनियर आहेत आणि वेगळ्या क्षेत्रात (कम्प्यूटर्स, मैकेनिकल,केमिकल ,इ।) कार्यरत आहेत. कौतुक करवासा वाटते की रोजची नोकरी करून घर देखील संभाळतात।हे सांगण्या मागचा इतकाच उद्देश की मुली मानसिक आणि शारारिक दृष्टया खुप...