Posts

Showing posts from August, 2016

आनंदगंध

पक्ष्यांचा  किलबिलाट  अलगद कानावर येत राहिला की साखर झोप अलवार  जागवते। किलकिल्या डोळ्यावाटे  खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणाच्या आभा,त्यासोबत आभाळभर पसरलेला शेंदरी रंगाचा  सडा लख्ख जागे करतो। विविध ऋतुतील सुर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी लाल ,शेंदरी ,भगवा ,पिवळा तर कधी कधी राखाड़ीसुद्धा. आपल्या अंतरातील रंगांची उधळण मुक्तपणे आभाळात पसरवितात अन आपल्याला कस प्रसन्न करून टाकतात।त्यात भर घालतात, पावसाळ्यात उमटणारे  इंद्रधनुष्य। कधी कमाणी स्वरुपात तर कधी एकमेकांमधे गोफविणुन  आकाशात मांडव टाकल्यासारखे ,सगळेच कसा मोहवून टाकणारे ,शिशिरात बदलत जाणारे झाड़ा-पानांचे बदलते रंग , त्यांची पानगळ,चैत्रात फुटणारी नवीकंच कोवळी पालवी, त्यांचा हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा ,ग्रीष्मात फुलणारा लालभडक गुलमोहर अन झाडावर हळुवार झूलणारा पिवळा धमक बहावा  हर एक पौर्णिमेची  रात्र काही औरच। अंधाराच्या पदरावर ,ठसठशीत उमटलेली चांदण्यांची नक्षिच जणू। शरदाच्या  दुधाळ चंद्राचा दिमाख तर विचारायलाच नको.वाहत्या पाण्यात प्रतिबिंबीत झाले...