शादी.कॉम

आजही मुलीचा पारंपारिक लग्न हे ताण वाढवणार , अनेकदा नैराश्य आणणारं
असतं...तुम्हाला मुलगी आहे ;हा तुमचा गुन्हा आहे असच अप्रत्यक्षपणे सुचवला जाणं हि भारतीय समाजाची शोकान्तिका म्हणायची का ?
कायद्यानुसार हुंडा देणा -घेणा बंद आहे ; पण आजही दुर्देवान अनेक ठिकाणी मुलीचा लग्न हि घरच्यांसाठी चिंतेची बाब आहे ..
लग्नाचा सगळा खर्च वधुपक्षाने करायचा या एका साध्या सरळ नियमाने सुद्धा वाधुपित्याचा कम्बरडा मोडून जातो , आयुष्यभराची कमाई खर्ची पडते .
"पण नको का ते करायला ?"असच होत आलय आत्तापर्यंत , मग आता कशाला बदलायचे ?
असा विचार जेव्हा प्रतिष्ठीत घरातले सुशिक्षीत लोक करतात तेव्हा शिक्षणाने , अनुभवाने तुमच्या विचारप्रक्रियेत , दृष्टीकोनात बदल होतो हे विधान खोटा वाटयला लागता .
आजही हुंडा घेतल्याशिवाय लगाना करत नाहीत लोक .मुलीत सगळे गुण तर हवे असतातच पण शिवाय कमावती पण असली पाहिजे , हुंडा पण भरपूर पाहिजे असतो , लग्नही करून द्या ;सगळ्या वस्तू द्या घरातल्या ; दागिने हवेच असतात ..

हुंड्यासाठी अडून बसलेले अनेक मागच्या व आत्ताच्या पिढीतील लोक पाहिलेत ..अशांना वधू पिता म्हणून खेटरे झिजवावी लागतात ..शेवटी कुणीतरी वरून बघतो आहे हे ते विसरतात .

आम्हाला काही नको फक्त मुलगी अन श्रीफळ द्या म्हणणारी वरपक्षाची लोक पण नंतर वधू ला तू हे नाही आणला ते नाही दिला असं म्हणतात ना तेव्हा कधी कधी प्रश्न पडतो कि लग्न करून नाती जोडली आहेत कि नवीन व्यवहार केला आहे .व्यवहार संपून जातात पण नाती संपत नाहीत .
आणि अशा वागण्याने त्या नात्या मध्ये काहीच अर्थ उरत नाहीत ..एक जबाबदारी म्हणून किंवा एक ओझ म्हणाला तरी चालेल ते निभावून न्यावा लागता .दिसायला सगळे नीट दिसतात पण त्या नात्यात प्रेम नाही .

मुलीच्या घराच्या लोकांनी जे प्रेमाने दिले ते घ्यावे कारण ते स्त्री धन म्हणून मुलीसाठी मुलीच्या आईने दिलेले धन असते .लग्नात हुंडा म्हणून काही मागणे आणि दीक्षा मागणे हे दोन्ही सारखेच . कन्यादानाच्या वेळी घर सोडणाऱ्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याची किंमत ज्या मुलाला कळत नाही तो तिच्या संसारातील दुखणं दूर काय करणार ..
मुलानो , विचार करा आपण समाजात कोणती परंपरा चालू ठेवायची कारण तुम्ही देखील एकदिवस एका मुलीचे बाप होणार आहात :)

Comments

Popular posts from this blog

Wish you were here!

To, My Brightest Star

मागे वळून पाहताना