मागे वळून पाहताना



अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी जायचा असा हाई स्कूल पासून निश्चित केलेला ध्येय  होत अणि घरचे वातावरण शैक्षणिक असल्याने घरुन तसा पाठिम्बा पण मिळाला। आठ वर्षाहून  अधिक काळ लोटला या परक्या देशात। हो परकाच होता तसा । माझ्या घरातून पहिली मुलगी अमेरिकेला येत होती। सगळ्यांना भीती अणि अभिमान असे दोन्ही भाव मनात  होते. विमानात बसेपर्यंत आपण एकटेच जात आहोत याची कल्पना सुद्धा नाही आली. पाहिले काही दिवस खुप अवघड होते नविन लोकांमधे रुळयला, नव्या देशाच्या  रीती-भातिषी  जुळून घ्यायला।पण  निभावला।जेवण अजीबात बनवाता येत नव्हते त्यामुळे यूट्यूब वर किंवा घरी फ़ोन करून आईला विचारायचे। वरचा खर्च भागावा म्हणून ठीक ठिकाणी केलेले काम. या सगळ्या अनुभवाने एका छोटया शहरातल्या मराठी माध्यमातून शिकून दुसऱ्या देशात एकट्याने प्रवास करणाऱ्या त्या माझ्याकड़े मागे वळुन पाहिले की उगाच कौतुक वाटते. असे धाडस सगळ्या मुलींनी एकदा तरी करावे।

आयुष्यात सगळ्याच गोष्टी  छान अणि मनासारख्या होतील अस नाही। या प्रवासात खाच खळगे  हे आहेतच।महत्वाची गोष्ट म्हणजे लोक तुमच्या आयुष्यात येतात आणि जातात।काही तुम्हाला शिकवण देतात तर काही तुमच्या सोबत कायम राहतात।महिलानी स्वतंत्र असल पाहिजे ,झाला पाहिजे असा आईच नेहमी सांगणे असे. अणि ती किती योग्य सांगायची हे एका कटु अनुभवाने शिकवले।  या वाईट काळात मैत्रीणी आणि घरापासून दूर असलेल्या पण तितकेच प्रेम देणाऱ्या कुटुंबाने जॉब  आणि घर नसताना  खुप  आधार दिला. संकट येतात म्हणून त्यापासून पळू नये तर त्याला धैर्याने सामोरे जावे. त्यातून एक नवी व्यक्ती जन्माला येते। घडलेल्या गोष्टी आपल्या हातात नसतात किंवा कोण आपल्या बद्दल काय मत मांडते यातही किती वास्तव आहे हे महत्वाचे नाही।प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. सुख अणि समाधान या स्वतःमधून घडतात तरच त्या दुसऱ्याला देता येतील।  या अनुभवातून एक चांगली शिकवण मिळाली की जी व्यक्ती आपल्याला  पुढे कधीही  कुठेही भेटेल तिच्याशी नेहमीच माणुसकी ने वागला पाहिजे कारण ती कुठल्या परिस्थिती मधून जात असते याची जाणीव आपल्याला नसते.

महिला कुठल्याही वर्णाची, वयाची किंवा कुठल्याही क्षेत्रातली असली तरी तिला वयाच्या प्रत्येक टप्प्यात स्वतःला सिद्ध करायला नेहमीच संघर्ष करावा लागतो।याचे  अद्ययावत उदहारण म्हणजे यू एस च्या या सत्राच्या राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीत एक महिला उमेदवार  आहे याचा खुप कौतुक वाटते  । इतक्या संपन्न आणि प्रगत   देशात एका महिलेला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवायला इतका काळ लोटला हे नवलच । मागे वळून माझ्या भारताकडे कडे पाहिला की अपाला देश अमेरिकेसमोर छोटा असेल कदाचीत पण जिजाऊ  ,झांशी ची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी आणि प्रतिभाताई पाटील या महिलांनी देशात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली याशिवाय कल्पना चावलाने वैद्न्यानिक क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली।

मनात कितीही वादळ असली जी रोज तुम्हाला बेभान कतील  पण सूर्योदय हा जसा  दररोज होतो आणि जग  प्रकाशीत करतो तसेच आपणही करू शकतो।जीवनातील संघर्ष आहे तसे स्वीकारून ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रवास यशस्वी करून साध्य परिणामामुळे इतरांच्या आयुष्याला परिमाण मिळवून देण्यातच जीवनाची सार्थकता असते।याची जाणीव व अनुभवच तुम्हाला जगण्याचे बळ देतात।व्यक्तीचा आत्मविशास त्याची कहाणी सांगून जात असते।

                                                                         ऋतुजा जगताप 

Comments

Popular posts from this blog

Wish you were here!

To, My Brightest Star