यंत्रांची कथा
अभियांत्रिकी दिवसावर सकाळ मधला माझा लेख-सप्टेंबर २६ ,२०१४
माझे नाव ऋतुजा जगताप.तुम्ही लिहिलेला दिव्य मराठी मधला इंजीनियर वर आधारित लेख वाचला आणि लिहावेसे वाटले.
मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्यूनिकेशन मधे इंजीनियरिंग पूर्ण केला आहे. माझी लहान दोन्ही भावंडा इंजीनियर्स आहेत. इथे आवर्जून नमूद कारावस वाटेल की माझी लहान बहिण मैकेनिकल इंजीनियर आहे.आमच्या पालकांनी अम्हा दोघी बहिणींना परदेशी उच्च शिक्षणासाठी पाठवले।
गेले ४ वर्ष मी टेलीकॉम क्षेत्रात कार्यरत आहे. टेलीकम्यूनिकेशन, नेटवर्किंग मधे काम करताना घेतलेल्या शिक्षणाचा नक्कीच उपयोग झाला आणि तो झालाच पाहिजे अशी एक इच्छा होती नोकरी शोधत असताना . भारतात किंवा परदेशात इंजीनियर्स ना खूप मागणी आहे. इथे माझ्या बहुतांश मैत्रिणी इंजीनियर आहेत आणि वेगळ्या क्षेत्रात (कम्प्यूटर्स, मैकेनिकल,केमिकल ,इ।) कार्यरत आहेत. कौतुक करवासा वाटते की रोजची नोकरी करून घर देखील संभाळतात।हे सांगण्या मागचा इतकाच उद्देश की मुली मानसिक आणि शारारिक दृष्टया खुप सशक्त असतात।
इंजीनियरिंग सारखे कोर्सेज कमी काळात करून पटकन नौकरी लागते असा मानून इंजीनियरिंगला न जाणे हा हेतु असू नये. ग्राफ़िक्स ,मेकेनिक्स आणि मैथमेटिक्स सारख्या विषयाना घाबरू नये. कुठलीही गोष्ट आपल्या बुद्धीच्या पलीकडची नसते. तिचा योग्य वापर केला पाहिजे।"Not failure, but Low Aim is Crime".१० वर्षांत खुप इंजीनियरिंग कॉलेजेस झाली आहेत आणि शिक्षण पद्धती सुद्धा सोपी झाली आहे. बोर्ड परीक्षा नाहीये, १२वीला गणीता ला प्रक्टिकल सुरू केले आहे. १२वी आणि CET चे गुण बघितले जातात इंजीनियरिंग च्या प्रवेशासाठी। आज सगळीकडे महागाई खूप वाढली आहे म्हणून फी च कारण पण देऊ नका जर तुम्हाला ख़रच इंजीनियर व्हायचे असेल तर। आपल्याकडे बँक मधून एजुकेशन लोन दिले जाते. त्यामुळे पालकांना सुद्धा मुलींच्या शिक्षणाचे दडपण येणार नाही।
मैत्रिणींनो,आजच्या सोशल नेटवर्किंग च्या काळात खुप पोट तिड़कीने संागवेसे वाटते कारण अभ्यास ,मैदानी खेळ किंवा जीवंत माणसांशी गप्पा याचा विसर पडतो आहे.आपण जर एखादा सिनेमा कमी बघितला ,स्मार्टफोन ऐवजी साधा फ़ोन वापरलात ,एखादा ड्रेस कमी घेतलात ,सोशल नेटवर्किंग पेक्षा नेटवर्किंग नक्की काय हे जाणून घेतला किंवा एकमेकांना बद्दल बोलण्या पेक्षा एकमेकांसोबत मिळून अभ्यास केलात तर त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे.
मला इंजीनियरिंग केल्यावर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे होते तशी ईच्छा घरच्याना बोलून दाखवली तेव्हा त्यांनी माझ्यासमोर २ पर्याय ठेवले की एक तर तू तुझ्या खर्चावर शिक्षण घे किंवा तितक्याच खर्चात आम्ही तुझे लग्न करु. पण मी पहिला पर्याय निवडला आणि घरच्यांनी त्याला पाठिंबा दिला। मैत्रिणींनो लग्न सगळ्यांचीच होतात पण चांगले शिक्षण सगळ्यांनाच नाहीं घेता येत । स्वतःचा अनुभव सांगण्या मागे इतकाच उद्देश की कुठल्याही कारणासाठी शिक्षण पणाला लाऊ नये .
इच्छा असेल तर नक्कीच मार्ग दिसेल
अभियांत्रिक दिवसाच्या खुप शुभेच्छा !
ऋतुजा

Comments
Post a Comment