येशील ?

पावसात लपवलेले आश्रु पुसायला येशील का रे तू ?
धुक्यात हरवलेली ती वाट दाखवायास येशील का रे तू ?
रणरणत्या उन्हात तुझ्या मायेची सावली पांघरशील का रे तू  ?
अंधारात चालताना लख्खा चंद्रप्रकाश होशील  का रे तू ?
तुझ्या आठवणीत आयुष्य जगताना ,नव्या आठवणी देशील का रे तू ?
माझ्या भाबड्या मनाला दिलासा देशील का असण्याचा तू?
तुझी नसून तुझीच म्हणून जगतीये ,त्या वेड्या मनाला भेटशील का रे तू?
आयुष्याच्या शेवटी,निरोप द्यायला तरी येशील का रे तू ?
तुझ्या परतीची चाहूल नाही , तरी येशील का रे तू ?


                                                                    --ऋतुजा 

Comments

Popular posts from this blog

Wish you were here!

To, My Brightest Star

मागे वळून पाहताना